Ad will apear here
Next
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निःशुल्क हेल्पलाइन; ध्वनिसंदेशांद्वारे माहिती
उपक्रमाची सुरुवात करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, तसेच आपत्ती व्यव्यस्थापन विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना, शेती-पशुपालनाची तांत्रिक माहिती, सामाजिक उपक्रम, रोजगार आदींसह अन्य आवश्यक माहिती ध्वनिसंदेशामार्फत देण्याचा उपक्रम नुकताच सुरू झाला. रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा (रत्नागिरी) आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. निःशुल्क हेल्पलाइनशी संपर्क साधून शेतकरी ही माहिती मिळवू शकतात.



जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते १३ ऑगस्टला या उपक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. या शेतकऱ्यांना शेती, पशुपालनविषयक तांत्रिक माहिती, शासकीय योजना, रोजगार आदींबद्दलची माहिती ध्वनिसंदेशांमार्फत दिली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी १८०० ४१९ ८८०० या रिलायन्स फाउंडेशनच्या निःशुल्क हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसात या वेळेत ही हेल्पलाइन खुली असेल, अशी माहिती रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यव्यस्थापक राजेश कांबळे यांनी दिली. 

या कार्यक्रमाला रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहायक विनोद गवाणकर व विक्रम जाधव उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZSHCD
Similar Posts
दांडी येथील महिलांना घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मालवण : दांडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील मच्छिमार महिलांना विविध प्रकारच्या घरगुती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नुकतेच देण्यात आले. रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
रत्नागिरीत जागतिक महासागर दिवस साजरा रत्नागिरी : येथील रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना प्रकल्प व महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत आज (आठ जून २०१९) जागतिक महासागर दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
‘रिलायन्स’च्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : येथील रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा शासकीय रुग्णालय व हातखंबा येथील रिलायन्स पेट्रोल पंप यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायन्स पेट्रोल पंप येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हातखंबा येथे २६ जूनला आरोग्य तपासणी शिबिर रत्नागिरी : येथील रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, हातखंबा येथील रिलायन्स पेट्रो मार्केटिंग लिमिटेड, रत्नागिरी रिटेल आउटलेट व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जून २०१९ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील रिलायन्स पेट्रोल पंप येथे होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language